जळगाव

प्रवाहाचा अंदाज चुकला... आणि झाडात अडकून वाचला 

बापू शिंदे

तरवाडे(ता.चाळीसगाव) : तांबोळे येथील तरुण गावाशेजारील तीतुर नदी पुलावरून मोटारसायकलसह वाहून जात होता परंतु दैव बलवत्तर म्हणून झाडात अडकून वाचला पुलावर संरक्षक कठडे बसवण्याची मागणी पप्पुदादा प्रतिष्ठाणच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

काल ता.24 रोजी रात्री दहाच्या सुमारास चाळीसगाव कडून येताना वाल्मीक परशुराम अहिरे वय 38 तांबोळे येथील रहिवाशी घराकडे जात असताना तितुर नदीला पूर आला पाण्याचा प्रवाह खूप कमी होता परंतु पुलाची उंची खूपच कमी असल्याने पुलावरून पाणी वाहत होते.पाण्याचा प्रवाह कमी पाहून पुलावरून मोटारसायकल टाकली. पुलाच्या मध्यात आल्यावर पाण्याच्या प्रवाहात काटेरी झुडूप वाहून आले त्यात गाडी अडकली व थोडा प्रवाह वाढला.त्यामुळे मोटारसायकलसह युवक प्रवाहात अडकला पोहता येत असल्याने कसाबसा किनाऱ्याला पोचला आणि गावातील ग्रामस्थांनी हा प्रकार पाहिल्याने तत्काळ धावून आले.

मागील तीन वर्षापूर्वी देखील तांबोळे येथील राजेंद्र पाटील या तरुणाचा मृत्यू अशाच घटनेमुळे झाला तरी या पुलाकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असून या पुलाची उंची तसेच त्याला संरक्षक कठडे देखील बांधले गेले नाही.अजून किती लोकांचा जीव गमवावा म्हणजे त्या पुलाला कठडे बांधले जाईल असा संतप्त प्रतिक्रिया या भागातील ग्रामस्थांनी व्यक्त केल्या याबाबत आपत्ती व्यवस्थापकिय अधिकारी म्हणून तहसीलदारांकडे युवासेना शाखा प्रमुख कृष्णा जाधव.उपशाखा प्रमुख प्रमोद कुमावत. मुन्ना पाटील.शालिक पाटील. दिगांबर जाधव.सुरेश पाटील.रोहित जाधव.समाधान चिकने.सुनील पाटील.देविदास जाधव.लाला पठाण.सुनील जाधव.यांनी पुलाची उंची वाढवावी व तात्पुरता स्वरूपात संरक्षक कठडे बांधण्याची मागणीचे निवेदन सुट्टी असल्याने सोशियल मिडीयाद्वारे दिले आहे.

संपादन-भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT